ट्रकने ऑटोला उडवले, ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडले; हातणीजवळील घटना, तिघे जखमी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकने ऑटोला उडवल्याने ऑटोतील वृद्धेसह मुलगी व ऑटोचालक असे तिघे जखमी झाले. ही घटना बुलडाणा -चिखली रोडवरील हातणीजवळ (ता. चिखली) २ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला होता. मात्र ग्रामस्थांनी त्याला पाठलाग करून पकडले. ऑटोचालक सिध्दार्थ नामदेव मोरे (४२, रा. हातणी ता. चिखली), त्यांची आई ध्रुपताबाई, त्यांच्या …
 
ट्रकने ऑटोला उडवले, ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडले; हातणीजवळील घटना, तिघे जखमी

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकने ऑटोला उडवल्याने ऑटोतील वृद्धेसह मुलगी व ऑटोचालक असे तिघे जखमी झाले. ही घटना बुलडाणा -चिखली रोडवरील हातणीजवळ (ता. चिखली) २ ऑगस्‍टला दुपारी चारच्‍या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालकाने पळ काढला होता. मात्र ग्रामस्‍थांनी त्‍याला पाठलाग करून पकडले.

ऑटोचालक सिध्दार्थ नामदेव मोरे (४२, रा. हातणी ता. चिखली), त्‍यांची आई ध्रुपताबाई, त्‍यांच्‍या गावातीलच मुलगी गायत्री बळराम जाधव (१०) अशी जखमींची नावे आहेत. ट्रकचालक तरुणसिंग सीताराम गौड (रा. रातनपूर रोड, भोपाळ मध्यप्रदेश) याच्‍याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना चिखलीतील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सिद्धार्थ मोरे यांच्‍याकडे ऑटो (क्रमांक एचएच २८ एमएचटी ३१७८) असून, हा ऑटो चालवून ते उदरनिर्वाह करतात.

२ ऑगस्‍टला त्‍यांची आई ध्रुपताबाई नामदेव मोरे या आजारी पडल्‍याने त्यांना ऑटोत बसवून चिखली येथील लध्दड हाॅस्पिटलला आणले. उपचार करून ते साडेतीनला घरी निघाले. राऊतवाडी स्टाॅपवर गावातीलच गायत्री बळीराम जाधव उभी होता. तिने हात दिल्याने तिलाही ऑटोत बसवून घेण्यात आले. हातणी गावाजवळ अचानक समोरून भरधाव आलेल्या ट्रकने धडक दिली. यात सिद्धार्थसह त्‍याची आई व गायत्री जखमी झाले.