ट्रकने मोटारसायकलला मागून उडवले, महिला ठार, पती-मुलगा जखमी; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रकने मागून मोटारसायकलला उडवल्याने 45 वर्षीय महिला जागीच ठार तर तिचा पती व मुलगा जखमी झाले. ही घटना काल, 31 मे रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास नांदुरा शहरातील मुंधडा यांच्या कार्यालयासमोर घडली. लीला हरिदास नागे (45, रा. संग्रामपूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती हरिदास तुळशीराम नागे (52) व …
 
ट्रकने मोटारसायकलला मागून उडवले, महिला ठार, पती-मुलगा जखमी; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ट्रकने मागून मोटारसायकलला उडवल्याने 45 वर्षीय महिला जागीच ठार तर तिचा पती व मुलगा जखमी झाले. ही घटना काल, 31 मे रोजी दुपारी पावणेचारच्‍या सुमारास नांदुरा शहरातील मुंधडा यांच्‍या कार्यालयासमोर घडली.

लीला हरिदास नागे (45, रा. संग्रामपूर) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्‍यांचे पती हरिदास तुळशीराम नागे (52) व मुलगा विजय (दोघे रा. संग्रामपूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे तिघे एचएफ डिलक्स मोटारसायकलने (क्र. एमएच 28 केएफ 2368) काल दुपारी संग्रामपूर येथून वडनेर येथे नातेवाइकांच्‍या अंत्‍यविधीसाठी नांदुरामार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ने जात होते. नांदुरा शहरातील मुंधडा यांच्‍या कार्यालयासमोरील रोडवर मागून खामगावकडून मलकापूरकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र.आरजे 19 जीएफ 5946) ने त्‍यांना उडवले.

ट्रक पुढे निघून गेला. यात लीला नागे गंभीर जखमी होऊन मरण पावल्‍या. दोघा बापलेकांना जबर मार लागला. नागरिकांनी धावून दोघांनाही सरकारी दवाखान्‍यात दाखल केले. ज्या ट्रकच्या चालकाने अपघात केला त्याला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनला आणले. हरिदास नागे यांच्‍या तक्रारीवरून ट्रकचालक अधूराम दुधी रुघाराम दुधी (रा. तरातरामठ, ता. चोहरन, जि. बारमेर, राजस्थान) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.