ट्रकमध्ये करकचून बांधले होते 58 बैल, चौघांचा मृत्‍यू…पोलिसांनी संशयावरून पकडले म्‍हणून फुटले बिंग!; मोताळा तालुक्‍यात कारवाई

मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः कत्तलीसाठी नेण्यात येणारे 58 बैल पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद ट्रक पकडल्यानंतर ही बाब समोर आली. ट्रक, गोवंशासह तब्बल 15 लाख 80 हजार रुपयांची ही कारवाई बोराखेडी पोलिसांनी 20 फेब्रुवारीच्या रात्री नरवाडी फाट्याजवळ (ता. मोताळा) केली.ट्रकमध्ये (क्र. आरजे 09, जीसी 5223) 58 बैलांना डांबून नेले जात होते. मागे कुटार भरून …
 

मोताळा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः कत्तलीसाठी नेण्यात येणारे 58 बैल पोलिसांच्‍या सतर्कतेमुळे वाचले आहेत. पेट्रोलिंगदरम्‍यान संशयास्‍पद ट्रक पकडल्‍यानंतर ही बाब समोर आली. ट्रक, गोवंशासह तब्‍बल 15 लाख 80 हजार रुपयांची ही कारवाई बोराखेडी पोलिसांनी 20 फेब्रुवारीच्‍या रात्री नरवाडी फाट्याजवळ (ता. मोताळा) केली.
ट्रकमध्ये (क्र. आरजे 09, जीसी 5223) 58 बैलांना डांबून नेले जात होते. मागे कुटार भरून थप्‍पी रचल्‍या होत्‍या. जेणेकरून कुणाला ट्रकमध्ये बैल असल्याचा संशय येऊ नये. बैलांना इतक्‍या निर्दयीपणे बांधले होते की त्‍यांना हलतासुद्धा येत नव्‍हते की पाणी किंवा खाण्याचीही काही व्‍यवस्‍था केली नव्‍हती. पोलिसांनी संशयावरून ट्रकला थांबवले. सुरुवातीला ट्रकचालकाने कुटार असल्याची बनवाबनवी केली. मात्र त्‍याच्‍या बोलण्यावरून संशय वाढल्‍याने ट्रकची तपासणी केली. तेव्‍हा आत बैल आढळले. यातील ४ बैल मृत झाले होते. 54 बैलांना तात्‍पुरते गोशाळेत ठेवण्यात आले आहे. पीएसआय अशोक रोकडे यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक वकील अली अजीज अली (सारंगपूर, जि. राजगड, मध्यप्रदेश) याला ताब्‍यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ठाणेदार माधवराव गरूड यांच्‍या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे, पीएसआय श्री. जवंजाळ, नंदकिशोर धांडे, पोकाँ श्री.भवटे, श्री. धामोडे, मंगेश पाटील, श्री. गायकवाड, श्री. खुरपुडे यांनी केली.