ट्रक 400 फूट खोल दरीत कोसळला; एक ठार, एक जखमी; बुलडाण्याच्‍या राजूर घाटातील घटना

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 400 फूट खोल दरीत ट्रक कोसळून झालेल्या अपघातात दोन चालकांपैकी एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने बचावला. ही घटना आज, 11 मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बुलडाणा शहराजवळील राजूर घाटात घडली. दिन मोहम्मद खान (40, रा. न्याळा, ता. किशनगड, जि. अन्वार, राजस्थान) असे ठार …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 400 फूट खोल दरीत ट्रक कोसळून झालेल्या अपघातात दोन चालकांपैकी एकाचा जागीच मृत्‍यू तर दुसरा वेळीच ट्रकमधून उडी मारल्याने बचावला. ही घटना आज, 11 मे रोजी पहाटे साडेतीनच्‍या सुमारास बुलडाणा शहराजवळील राजूर घाटात घडली.

दिन मोहम्मद खान (40, रा. न्‍याळा, ता. किशनगड, जि. अन्वार, राजस्‍थान) असे ठार झालेल्याचे नाव असून, जो चालक ट्रक चालवत होता तो सेहरून मोजू खान (38, रा. चावडीकला, जि. अलुपर, राजस्‍थान) जखमी झाला आहे. अपघाताबद्दल सूत्रांनी सांगितले, की ट्रक (क्रमांक आरजे 02, जीबी0924) मध्ये नारळ घेऊन सेहरून व दिन मोहम्‍मद हे बंगळुरूवरून दिल्लीला निघाले होते. बुलडाण्यावरून मलकापूरकडे जात असताना राजूर घाटातील मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण हरवून ट्रक 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळला. सेहरूनने वेळीच ट्रकमधून उडी मारून स्‍वतःचे प्राण वाचवले. मात्र दिन मोहम्मदला काही बाहेर पडता आले नाही. त्‍याचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी या दोघांचा मित्र ज्‍यालाही आग्र्याला जायचे होते, पण जागा नसल्याने सेहरूनने ट्रकमध्ये बसवून घेतले नव्‍हते त्‍याने बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी सेहरूनविरुद्ध ट्रक भरधाव व निष्काळजीपणाने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्‍याचा गुन्‍हा दाखल केला आहे. तपास एएसआय विनोद शिंदे करत आहेत.