ट्रॅक्‍टरचा दुचाकीला धक्का; चिमुकल्याचा मृत्‍यू, मेहकर शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीला ट्रॅक्टरचा धक्का लागून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली येऊन तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, 12 मार्चला दुपारी 3:30 च्या सुमारास घडली. करण महादेव धोटे (रा. मोळा, ता. मेहकर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. वडील माधव धोटे पत्नी व मुलगा करणसह मेहकरहून मोळा येथे जात होते. शहरातील …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दुचाकीला ट्रॅक्‍टरचा धक्का लागून झालेल्या अपघातात ट्रॅक्टरखाली येऊन तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना काल, 12 मार्चला दुपारी 3:30 च्या सुमारास  घडली.

करण महादेव धोटे (रा. मोळा, ता. मेहकर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. वडील माधव धोटे पत्‍नी व मुलगा करणसह मेहकरहून मोळा येथे जात होते. शहरातील रस्त्याचे काम सुरू असल्याने  एका बाजूला रस्त्याचे काम अन दुसऱ्या बाजूला वाहतुक सुरू आहे. या अरूंद रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते. शहरातील शर्मा गॅरेजसमोर दुचाकीला ट्रॅक्टरचा धक्का लागला. यात आई- वडील एका बाजूला पडले तर करण ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्‍याला तातडीने रुग्‍णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.