ठाणेदारांनी समजावून सांगितला अंडे का फंडा!; पत्नीला म्हणाले, भरव पतीला घास!!; साखरखेर्डातील चकीत करणारी घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंडे का फंडा काय असतो, हे ठाणेदारांनी समजावून सांगत पती-पत्नीचे भांडण अनोख्या पद्धतीने मिटविल्याचे साखरखेर्डात आज समोर आले आहे.झाले असे, की पतीला भूक लागल्याने त्याने स्वतःसाठी दोन बॉईल अंडी घरी आणली. पतीने स्वतःसाठी आणलेली ती अंडी पत्नीने लाडक्या मुलांना खाऊ घातली. उपाशी पतीराजाचा मग राग अनावर झाला. यातून पती- पत्नीचे …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अंडे का फंडा काय असतो, हे ठाणेदारांनी समजावून सांगत पती-पत्नीचे भांडण अनोख्या पद्धतीने मिटविल्याचे साखरखेर्डात आज समोर आले आहे.
झाले असे, की पतीला भूक लागल्याने त्याने स्वतःसाठी दोन बॉईल अंडी घरी आणली. पतीने स्वतःसाठी आणलेली ती अंडी पत्नीने लाडक्या मुलांना खाऊ घातली. उपाशी पतीराजाचा मग राग अनावर झाला. यातून पती- पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. अंड्याचा हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी संपूर्ण प्रकरण समजून घेत प्रकरण डायरीत नोंद न करताच मिटवण्याचे ठरवले. ठाणेदारांनी ठाण्यातच दोन बॉईल केलेली अंडी मागवली. पत्नीला पतीराजांचा घास भरवण्याचे सांगितले. पत्नीनेही बॉईल केलेल्या अंड्याचा घास पतीला भरवला आणि लगेच वाद मिटलाही. ठाणेदारांनी वाद मिटवण्यासाठी वापरलेल्या या अंडे का फंड्याची जोरदार चर्चा होत आहे.