डाव्‍या हातावर “गोपाल’ गोंदलेला मृतदेह शेगावमध्ये आढळला!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शेगाव शहरातील उन्हाळ नाल्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा मृतदेह आढळला. मृतदेह अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा असल्याचे कळते. शेगाव शहर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीच्या अंगात काळा टी शर्ट असून, त्याच्या डाव्या हातावर “गोपाल’ असे गोंदलेले असल्याचे …
 
डाव्‍या हातावर “गोपाल’ गोंदलेला मृतदेह शेगावमध्ये आढळला!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शेगाव शहरातील उन्हाळ नाल्याजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. आज, २५ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्‍या सुमारास हा मृतदेह आढळला. मृतदेह अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा असल्याचे कळते. शेगाव शहर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीच्या अंगात काळा टी शर्ट असून, त्याच्या डाव्या हातावर “गोपाल’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, तपास शेगाव शहर पोलीस करीत आहेत.