‘डीवायएसपी’ बरकते करणार भादोलातील महिलेच्या खुनाचा तपास!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या विरोधात चोरीची तक्रार दिली म्हणून वहिनीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून दिराने तिचा खून केल्याची घटना भादोला येथे 28 जानेवारीला समोर आली होती. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते करणार आहेत. 27 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 च्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या विरोधात चोरीची तक्रार दिली म्हणून वहिनीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून दिराने तिचा खून केल्याची घटना भादोला येथे 28 जानेवारीला समोर आली होती. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते करणार आहेत.

27 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास तालुक्यातील भादोला येथे नात्याने दीर असलेल्या राजू चिकांजी गवई (38, रा. भादोला) याने वहिनी बेबीताई संतोष गवई (55) हिचा लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केले होते. त्यामुळे जखमी अवस्थेत बेबीताई यांच्यावर बुलडाणा येथे प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान 28 जानेवारी रोजी दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मागील महिन्यात बेबीताई गवई यांच्या घरी चोरी झाल्याने त्यांनी दीर राजू विरोधात बुलडाणा ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळेच चिडलेल्या राजूने बेबीताई यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार बेबीताई यांचे पती संतोष गवई यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.