‘डीवायएसपी’ रस्त्यावर; शहरात तीन दिवसांत 57400 रुपयांचा दंड

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था त्यामुळे होणारे मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहेत. सकाळी 11 नंतरही विनाकारण फिरणाऱ्यांवर स्वतः उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. गेल्या तीन दिवसांत बुलडाणा शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 178 वाहनधारकांवर कारवाई …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्णांची वाढती संख्या, अपुरी आरोग्य व्यवस्था त्यामुळे होणारे मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला दिले आहेत. सकाळी 11 नंतरही विनाकारण फिरणाऱ्यांवर  स्वतः उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली.

गेल्या तीन दिवसांत बुलडाणा शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 178 वाहनधारकांवर कारवाई केली. त्यासोबतच नगर पालिकेच्या पथकाने  55 जणांविरोधात कारवाई केली. या संयुक्त कारवाईत 57 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आज, 23 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 11:45 या कालावधीत पोलीस आणि नगरपालिका पथकेतर्फे 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.