डॉक्‍टरांचा असाही प्रामाणिक.. देऊळगाव महीतील घटना

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देवदर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र तुटून पडले. बराच शोध घेऊनही महिलेला ते सापडले नाही. दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या डॉक्टर नारायण लाड यांना हे मंगळसूत्र सापडले.त्यांनी शोध घेऊन त्या महिलेला हे मंगळसूत्र परत केले. डॉक्टरांच्या प्रामाणिकपणाची चर्चा सध्या अवघ्या तालुक्यात होत आहे.ही घटना घडली डिग्रस बुद्रूक (ता. देऊळगाव राजा) येथे. झाले …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देवदर्शनासाठी आलेल्या महिलेचे मंगळसूत्र तुटून पडले. बराच शोध घेऊनही महिलेला ते सापडले नाही. दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या डॉक्‍टर नारायण लाड यांना हे मंगळसूत्र सापडले.त्‍यांनी शोध घेऊन त्‍या महिलेला हे मंगळसूत्र परत केले. डॉक्‍टरांच्‍या प्रामाणिकपणाची चर्चा सध्या अवघ्या तालुक्‍यात होत आहे.
ही घटना घडली डिग्रस बुद्रूक (ता. देऊळगाव राजा) येथे. झाले असे, की लताबाई नारायण पऱ्हाड या 9 मार्चला सायंकाळी गणेश मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्‍या. त्‍याचवेळी त्‍यांचे मंगळसूत्र अचानक तुटून पडले. ते वेळीच लक्षात आले नाही. बराच वेळ गेल्यानंतर लताबाईंना मंगळसूत्र हरवल्याचे लक्षात आले. त्‍यांनी तातडीने शोधाशोध सुरू केली. पण मंगळसूत्र काही मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी आलेल्या डॉ. नारायण लाड यांना हे मंगळसूत्र सापडले. त्‍यांनी चौकशी केली असता हे मंगळसूत्र लताबाईंचे असल्याचे कळाले. त्‍यांनी खातरजमा करून ते त्‍यांना परत केले.