डॉ. वरकड यांचा अपघाती मृत्‍यू; शारा गावावर शोककळा

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शारा (ता. लोणार) येथील रहिवासी डॉ. शिवशंकर वरकड यांचा दुचाकींची समोरासमोर धडक होऊन मृत्यू झाला. ही घटना 4 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेदरम्यान लोणीजवळील खटकाळी चढउतारावर घडली. दुसरे दुचाकीचालक नवनाथ नारायण धोत्रे (रा. सावखेड, ता. शेनगाव, जि. हिंगोली) हेही अपघातात जखमी झाले आहेत. मोप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः शारा (ता. लोणार) येथील रहिवासी डॉ. शिवशंकर वरकड यांचा दुचाकींची समोरासमोर धडक होऊन मृत्‍यू झाला. ही घटना 4 एप्रिलच्‍या दुपारी 12 वाजेदरम्‍यान लोणीजवळील खटकाळी चढउतारावर घडली.

दुसरे दुचाकीचालक नवनाथ नारायण धोत्रे (रा. सावखेड, ता. शेनगाव, जि. हिंगोली) हेही अपघातात जखमी झाले आहेत. मोप येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्‍हणून डॉ. वरकड सेवा देत होते. त्‍यांचा प्रोबेशनल कालावधी 30 एप्रिललाच संपला होता. मोपचे आरोग्‍य अधिकारी डॉ. आशिष सिंह यांना अपघाताची माहिती मिळताच ते रुग्‍णवाहिका घेऊन घटनास्‍थळी दाखल झाले. दोन्‍ही जखमींना त्‍यांनी रिसोड येथील शासकीय रुग्‍णालयात दाखल केले. डॉ. वरकड यांची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. डॉ. वरकड यांच्‍या निधनाची वार्ता शारा येथे कळताच गावावर शोककळा पसरली.