डॉ. शिंगणे करणार नाहीत वाढदिवस साजरा!; कोरोनामुळे भेटीही टाळणार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस आहे. मात्र गेल्या वर्षाभरापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपला वाढदिवस कोणीही साजरा करू नये, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. त्याऐवजी रक्तदान शिबिर, …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस आहे. मात्र गेल्या वर्षाभरापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी आपला वाढदिवस कोणीही साजरा करू नये, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. त्याऐवजी रक्तदान शिबिर, कोरोना जागृतीविषयक कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोनामुळे 30 मार्च रोजी डॉ. शिंगणे कोणालाही भेटणार नाहीत. कोणीही पुष्पगुच्छ, हारतुरे, शुभेच्छा बॅनर यावर  खर्च करू नये. तो पैसा गरजू कोरोना रुग्णांना द्यावा. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबीर व कोरोनाशी संबंधित कार्यक्रम वगळता इतर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे याच माझ्यासाठी आपणाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा राहतील, असेही डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

बुलडाणा लाइव्‍हचा विशेषांक होणार प्रसिद्ध

पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्‍या वाढदिवसानिमित्त बुलडाणा लाइव्‍हतर्फे साहेब हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अंकात डॉ. शिंगणे यांचा आजवरचा प्रवास अधोरेखित करण्यात आला असून, साहेबांच्‍या चाहत्‍यांसाठी ही पुरवणी आकर्षण ठरणार आहे.