डॉ. संजय कुटे शेगावमध्ये म्‍हणतात, उपेक्षित घटकाचा विकास हेच ध्येय!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे. निस्वार्थ भावनेने केलेल्या वैद्यकीय सेवेचे समाधान कुठल्याही मापात तोलता येत नाही. उपेक्षित घटकाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. भाजपा वैद्यकीय आघाडीच्या राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियानाच्या अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते शेगावमध्ये १५ ऑगस्टला बोलत होते. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष …
 
डॉ. संजय कुटे शेगावमध्ये म्‍हणतात, उपेक्षित घटकाचा विकास हेच ध्येय!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रुग्‍णसेवा हीच ईश्वरसेवा आहे. निस्वार्थ भावनेने केलेल्या वैद्यकीय सेवेचे समाधान कुठल्‍याही मापात तोलता येत नाही. उपेक्षित घटकाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. संजय कुटे यांनी केले. भाजपा वैद्यकीय आघाडीच्‍या राष्ट्रीय स्वास्‍थ स्वयंसेवक अभियानाच्‍या अभ्यास वर्गाच्‍या उद्‌घाटन प्रसंगी ते शेगावमध्ये १५ ऑगस्‍टला बोलत होते.

व्‍यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश फुंडकर, माजी नगराध्यक्ष ॲड. शरदसेठ अग्रवाल, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश सराफ, नगराध्यक्षा सौ. शकुंतलाबाई बुच, उपाध्यक्षा सौ. सुषमाताई शेगोकार, जिल्हा सरचिटणीस संतोषराव देशमुख, नंदू अग्रवाल यांची उपस्‍थिती होती. भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोना काळात रुग्‍णांची सेवा केली. भविष्यात देखील भाजपा रुग्‍णसेवेसाठी तत्‍पर असेल, असे डॉ. कुटे म्‍हणाले. जिल्हा सदस्य डॉ. मोहन बानोले, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, तालुकाध्यक्ष विजय भालतडक, संजय कलोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.