डॉ. सानप यांच्या मृत्यूला कारणीभूत वाहनचालकाला पकडले; लोणार पोलिसांची कामगिरी

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉर्निंग वॉक करताना वाहनाने धडक दिल्याने डॉ. सुरेश फकिरराव सानप (४७, रा. सहकारनगर, लाेणार) यांचा काल वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, १४ ऑगस्टला अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेऊन चालकालाही लोणार पोलिसांनी ताब्यात घेतले. अंकुश चंद्रकांत बोराडे (३४, रा. …
 
डॉ. सानप यांच्या मृत्यूला कारणीभूत वाहनचालकाला पकडले; लोणार पोलिसांची कामगिरी

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मॉर्निंग वॉक करताना वाहनाने धडक दिल्याने डॉ. सुरेश फकिरराव सानप (४७, रा. सहकारनगर, लाेणार) यांचा काल वाढदिवसाच्या दिवशीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज, १४ ऑगस्टला अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेऊन चालकालाही लोणार पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंकुश चंद्रकांत बोराडे (३४, रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. त्याला महिंद्रा कंपनीच्या एम एच १७,बी वाय ६६४० या दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या वाहनाचा शोध लावण्यासाठी लोणार पोलिसांनी आर्णी (जि. यवतमाळ) पोलिसांची मदत घेतली. तांत्रिक तपासाच्या आधारे वाहन निष्पन्न करून त्याची माहिती आर्णी पोलिसांना दिल्यानंतर तिथल्या पोलिसांनी पाठलाग करून वाहनचालकाला वाहनासह ताब्यात घेतले. आज लोणार पोलिसांनी आरोपीला आर्णी पोलिसांकडून ताब्यात घेतले.