डोणगावचे सहकार विद्या मंदिर फोडले!; प्राचार्यांची केबिन फोडून चोरून नेली टीव्‍ही

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोणगाव (ता. मेहकर) येथील सहकार विद्या मंदिरात घुसून प्राचार्यांची केबिन फोडून चोरट्यांनी एलईडी टीव्ही व प्रोजेक्टर असा २६ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना १९ जुलै ते २० जुलैच्या रात्रीतून घडली. प्राचार्य आनंद भास्कर देशमुख यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः डोणगाव (ता. मेहकर) येथील सहकार विद्या मंदिरात घुसून प्राचार्यांची केबिन फोडून चोरट्यांनी एलईडी टीव्‍ही व प्रोजेक्‍टर असा २६ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. ही घटना १९ जुलै ते २० जुलैच्‍या रात्रीतून घडली. प्राचार्य आनंद भास्कर देशमुख यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास नापोकाँ विष्णू जायभाये करत आहेत.

शेतातील टिनशेड फोडले
यादव दौलतराव सानप (रा. पिंपळनेर ता. लोणार) यांचे शेतातील टिनशेड फोडून चोरट्यांनी २८ पोते भूईमूग शेंगाचे पोते (वजन १० क्विंटल, किंमत ३५ हजार), ज्वारीच्या तीन थैल्या (वजन दीड क्किंटल, किंमत दीड हजार रुपये) यासह आैषधी फवारणी पंप व चार्जिंग फॅन असा एकूण ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना लोणार ते लोणी रोडच्‍या बाजूला पिंपळनेर शिवारात १९ ते २० जुलैच्‍या रात्रीतून घडली. या प्रकरणी सानप यांच्‍या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास सहायक फौजदार बन्सी पवार करत आहेत.