डोणगावमधून २० वर्षीय तरुणी गायब!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत महिला, तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल, १८ जूनला डोणगाव आणि पिंपळगाव राजा येथून तरुणी, तरुण घरातून निघून गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. डोणगाव (ता. मेहकर) येथून २० वर्षीय बेपत्ता झाली आहे. घरात कुणाला काही न सांगता ती निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत महिला, तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. काल, १८ जूनला डोणगाव आणि पिंपळगाव राजा येथून तरुणी, तरुण घरातून निघून गेल्याच्‍या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या.

डोणगाव (ता. मेहकर) येथून २० वर्षीय बेपत्ता झाली आहे. घरात कुणाला काही न सांगता ती निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळाल्‍याने डोणगाव पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार करण्यात आली आहे. आचल गजेंद्र जोरेवार असे या तरुणीचे नाव आहे.

पिंपळगाव राजा (ता. खामगाव) येथूनही २३ वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून, अमोल विठ्ठल करांगळे हरवल्याची तक्रार त्‍याच्‍या कुटुंबियांनी पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍याचाही शोध घेण्यात येत आहे.