ढगफुटीचा विध्वंस… चिखली : 11 गावांत 2050 हेक्टर जमिनीचे नुकसान; मेहकर : 3 गावांतील 188 हेक्टर जमीन खरडली

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काल, 28 जूनला सायंकाळी चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात अक्षरशः ढगफुटी झाली होती. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकरी, गावकरी आणि प्रशासनाची सुद्धा धावपळ उडाली. आज, 29 जूनला सकाळपासून महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात पोहोचले होते. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल तहसील प्रशासनाकडे पाठविला आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काल, 28 जूनला सायंकाळी चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात अक्षरशः ढगफुटी झाली होती. त्‍यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतकरी, गावकरी आणि प्रशासनाची सुद्धा धावपळ उडाली. आज, 29 जूनला सकाळपासून महसूल व कृषी विभागाचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात पोहोचले होते. त्यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल तहसील प्रशासनाकडे पाठविला आहे.

चिखली तालुक्यातील 11 गावांतील 1 हजारांवर शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान झाले. अंदाजे 2050 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही शेतजमिनीचे एवढे नुकसान झाले की अधिकाऱ्यांना तिथपर्यंत पोहोचताही आले नाही, अशी माहिती चिखलीचे तहसीलदार अजितकुमार येळे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. मेहकर तालुक्यातही या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील 3 गावांतील 115 शेतकऱ्यांचे 188 हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार संजय गरकल यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.