ढाब्यावरील कामगाराला मारहाण करत लुटणाऱ्या तिघांना अटक; खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवण करून बिल न देताच तिघांनी पळ काढला होता. पाठलाग करणाऱ्या ढाब्यावरील कामगाराला मारहाण करत मोबाईल आणि पाच हजार रुपयेसुद्धा लांबवले होते. ही घटना 22 मार्च रोजी सायंकाळी खामगाव शहरात घडली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिघांना आज, 24 मार्चला अटक केली आहे. हरिओम उर्फ हरीश चव्हाण, धीरज भालतिडक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवण करून बिल न देताच तिघांनी पळ काढला होता. पाठलाग करणाऱ्या ढाब्यावरील कामगाराला मारहाण करत मोबाईल आणि पाच हजार रुपयेसुद्धा लांबवले होते. ही घटना 22  मार्च रोजी सायंकाळी खामगाव शहरात घडली होती. याप्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तिघांना आज, 24 मार्चला अटक केली आहे. हरिओम उर्फ हरीश चव्हाण, धीरज भालतिडक व धनंजय खर्चे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खामगाव- शेगाव रोडवर दिलेश रामभाऊ शेगोकार (38, रा. रामनगर हंसराज कॉलनी, खामगाव) यांचा समर्थ नावाचा ढाबा आहे. 22 मार्चला सायंकाळी ते ढाब्यावर नसताना हरिश नंदू चव्हाण व त्याचे 2 मित्र जेवणासाठी आले होते. जेवणाचे बिल 700 रुपये झाले असता त्यांना ढाब्यावरील कामगार मनोज सोनोने यांनी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे न देता तेथून पळ काढला. मनोजने त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी एसटी वर्क शॉपसमोरील रोडवर त्‍याला लाथा बुक्‍क्या व बेल्टनी मारहाण केली होती. मनोजचा  मोबाइल व खिशातील पाच हजार रुपये घेऊन त्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी ढाबा मालक दिलेश शेगोकार यांच्‍या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली.