ढाब्यावर जेवणानंतर बिल न देता कामगाराला बदडले! खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवण करून बिल न देताच तिघांनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्या ढाब्यावरील कामगाराला बेदम मारहाणही केली. त्याचा मोबाइल आणि पाच हजार रुपये पळविले. ही घटना 22 मार्चच्या सायंकाळी खामगाव शहरात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खामगाव- शेगाव रोडवर दिलेश रामभाऊ शेगोकार (38, रा. रामनगर, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवण करून बिल न देताच तिघांनी पळ काढला. पाठलाग करणाऱ्या ढाब्यावरील कामगाराला बेदम मारहाणही केली. त्‍याचा मोबाइल आणि पाच हजार रुपये पळविले. ही घटना 22 मार्चच्‍या सायंकाळी खामगाव शहरात घडली. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव- शेगाव रोडवर दिलेश रामभाऊ शेगोकार (38, रा. रामनगर, खामगाव) यांचा समर्थ ढाबा आहे. ते ढाब्यावर हजर नसताना हरीश नंदू चव्हाण व त्यांचे 2 मित्र जेवणासाठी आले. जेवणाचे बिल 700 रुपये झाले असता त्यांना ढाब्यावरील कामगार मनोज सोनोने यांनी पैसे मागितले. त्यांनी पैसे न देता तेथून पळ काढला. सानोनेने त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी एसटी वर्क शॉप समोरील रोडवर सोनोनेला मारहाण केली.यात आणखी कारमध्ये आलेल्या तिघांनीही सहभाग घेत लाथा बुक्‍क्या व बेल्टनी मारहाण केली. सोनोनेचा मोबाईल व  खिशातील पाच हजार रुपये घेऊन त्यांनी पळ काढला. याप्रकरणी शेगोकार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हरीश नंदू चव्हाण व त्याच्या मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.