ढाब्यावर जेवायला थांबलेला ट्रकचालक गायब!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवणासाठी थांबल्यानंतर शौचास गेलेला ट्रकचालक गायब झाला आहे. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास खामगावजवळील सजनपुरी येथील शिवगंगा ढाब्यावर घडली. बराच शोध घेऊनही ट्रकचालक न सापडल्याने अखेर आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.ट्रकमालक शे. सादिक शे. शौकत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढाब्यावर जेवणासाठी थांबल्यानंतर शौचास गेलेला ट्रकचालक गायब झाला आहे. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास खामगावजवळील सजनपुरी येथील शिवगंगा ढाब्यावर घडली. बराच शोध घेऊनही ट्रकचालक न सापडल्याने अखेर आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
ट्रकमालक शे. सादिक शे. शौकत यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी ट्रकचालक हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. मध्यप्रदेशातील इंदौर येथून मंगळुरपीर येथे आलू व लसून घेऊन ट्रक आला होता. तेथून ट्रक खाली करून चालक रामलाल नरसिंग बिलाले (40, रा. शहापूर, मध्यप्रदेश) हा ट्रकचे भाडे घेऊन परतत असताना खामगावच्या सजनपुरी शिवारातील शिवगंगा ढाबा येथे रात्रीच्या जेवणासाठी थांबला होता. जेवण केल्यानंतर क्लिनरला शौचास जाऊन येतो असे सांगून तो निघून गेला. त्यानंतर तो गायब झाला. क्लिनरने बराच वेळ वाट बघून शेवटी ट्रक मालकाला संपर्क केला असता आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. त्याच्या नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेऊनही तो मिळून आला नाही. तपास पोहेकाँ श्री. तडवी करत आहेत.