तंटामुक्‍ती अध्यक्षांनाही विकृताचा फटका… 2 हरभरा सुड्या पेटवल्‍या; चिखली तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मंगरूळ (इसरुळ) (ता. चिखली) येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष भाऊसाहेब वरपे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 2 हरभरा सुडी कुणातरी विकृताने पेटवून दिल्या. ही घटना 6 मार्च रोजी उजेडात आली. त्यातून त्यांना 18 क्विंटल हरभरा पिकाचे उत्पन्न अपेक्षित होते. श्री. वरपे 6 मार्चला शेतात मळणी यंत्र व ट्रॅक्टर घेऊन हरभरा काढण्यासाठी गेले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  मंगरूळ (इसरुळ) (ता. चिखली) येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष भाऊसाहेब वरपे यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 2 हरभरा सुडी कुणातरी विकृताने पेटवून दिल्या. ही घटना 6 मार्च रोजी उजेडात आली. त्यातून त्यांना 18 क्‍विंटल हरभरा पिकाचे उत्पन्न अपेक्षित होते.

श्री. वरपे 6 मार्चला शेतात मळणी यंत्र व ट्रॅक्टर घेऊन हरभरा काढण्यासाठी गेले होते. त्यांना  समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला.सुरुवातीला त्यांना सुडी चोरून नेल्याचे वाटले. मात्र जवळ गेल्यानंतर बघितले तर संपूर्ण सुडी जळून खाक झाली होती. तेथून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या शेतातील सुडी सुद्धा जाळून टाकण्यात आली होती. विशेष म्हणजे वरपे यांच्या दोन सुड्यांच्या मध्ये असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या सुड्या मात्र सुरक्षित होत्या. याबाबत वरपे यांनी आपले कुणासोबतही भांडण नसून कुणावरही संशय नसल्याचे सांगितले. अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.