तब्बल 13 जणांचे मृत्यू!; आज 1103 पॉझिटिव्ह, 4 दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा कोरोना स्फोट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 4 दिवसांच्या दिलासादायक ब्रेकनंतर आज, 7 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी चारचा आकडा गाठला! एकीकडे 1103 रुग्ण आढळले असतानाच 24 तासांत तब्बल 13 रुग्ण दगावल्याने जिल्हा हादरलाय! एकट्या बुलडाणा तालुक्याने 333 चा आकडा गाठला असून, 10 तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती दिसून येत आहे. मागील 4 दिवसांत …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 4 दिवसांच्या दिलासादायक ब्रेकनंतर आज, 7 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांनी चारचा आकडा गाठला! एकीकडे 1103 रुग्ण आढळले असतानाच 24 तासांत तब्बल 13 रुग्ण दगावल्याने जिल्हा हादरलाय! एकट्या बुलडाणा तालुक्याने 333 चा आकडा गाठला असून, 10 तालुक्यांत कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती दिसून येत आहे.

मागील 4 दिवसांत 3 आकडी रुग्णसंख्या आल्याने प्रशासन व  आरोग्य यंत्रणा काहीशा रिलॅक्स होत्या. 3 मे रोजी 728, 4 मे रोजी 879, 5 मे रोजी 614 तर 6 मे रोजी 641 पॉझिटिव्ह आले. मात्र आजचा शुक्रवार काहीसा घातवार, शॉकिंग फ्रायडे  ठरलाय! बुलडाण्यातील महिला रुग्णालय व चिखली येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील प्रत्येकी 3 रुग्ण दगावले. याशिवाय खामगाव सामान्य रुग्णालय, टीसीयू नांदुरा, टीबीएस, आशीर्वाद आणि लद्धड बुलडाणामधील प्रत्येकी एका रुग्णाचा  उपचारादरम्यान मृत्यू ओढावला.

बुलडाणा 333?

गत 24 तासांत बुलडाणा तालुक्यात कोरोनाचा (333 पॉझिटिव्ह) अक्षरशः स्फोट झाल्यासारखे चित्र आहे. याशिवाय चिखली 141, मेहकर 117, मोताळा 103 या तालुक्यांनी शंभरी पार केली. या तुलनेत इतर तालुके फार मागे नाहीत. नांदुरा 85, जळगाव 72, लोणार 66, सिंदखेड राजा 59, मलकापूर 53, खामगाव 45 अशी आकडेवारी आहे. मात्र देऊळगाव राजा 24,  शेगाव 5 आणि संग्रामपूर 0 या तालुक्यांचे आकडे किमान आज कमी आहेत,  उद्याचे कोरोना उर्फ कोविडलाच ठाऊक!