…तरच सरकारी कार्यालयात एन्‍ट्री!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येऊ नये. तसेच शासकीय कार्यालयात अतिआवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासांतील प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. हे निर्देश सोमवार 12 एप्रिलपासून लागू होणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांनी अत्यावश्यक कामाशिवाय येऊ नये. तसेच शासकीय कार्यालयात अतिआवश्यक काम असल्यास अभ्यागतांनी त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्याबाबतचे मागील 48 तासांतील प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. हे निर्देश सोमवार 12 एप्रिलपासून लागू होणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे निवेदन देण्यासाठी न येता ऑनलाईन collector.buldhana@maharashtra.gov.in rdc_buldhana@rediffmail.com या ईमेल आयडीवर पाठवावे, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.