तरुणीला पळवले, सिंदखेड राजात जैन समाज आक्रमक

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील तरुणीला सहायक अध्यापिका स्वाती नेमाडे व तिचा भाऊ सचिन नेमाडे यांनी पळवून नेल्याची तक्रार तरुणीच्या आईने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात केली आहे. तरुणीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जैन समाजही आक्रमक झाला असून, त्यांनी ठाणेदारांना निवेदन दिले आहे. २० जुलैला दुपारी एका पांढऱ्या कारमधून आलेल्या स्वाती …
 

सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा येथील तरुणीला सहायक अध्यापिका स्वाती नेमाडे व तिचा भाऊ सचिन नेमाडे यांनी पळवून नेल्याची तक्रार तरुणीच्‍या आईने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात केली आहे. तरुणीला तिच्‍या आई-वडिलांच्‍या ताब्‍यात देण्याच्‍या मागणीसाठी जैन समाजही आक्रमक झाला असून, त्‍यांनी ठाणेदारांना निवेदन दिले आहे.

२० जुलैला दुपारी एका पांढऱ्या कारमधून आलेल्या स्वाती व सचिनने तरुणीला दर्शनासाठी जायचे आहे असे सांगून गाडीत बसवले व पळवून नेले. याच गाडीत त्‍यांचे आई-वडील, स्वातीचा पती मनोज किटुकले व चालक असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. स्वाती व सचिन हेच सूत्रधार असून, त्‍यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल करून मुलीला परत आणण्याची मागणी मुलीच्‍या आईने केली आहे.

जैन समाज संघटनेसह राजकीय पक्षांनी दिले निवेदन
तरुणीला आई-वडिलांच्‍या ताब्‍यात देण्यासाठी जैन समाज संघटना व राजकीय पक्षांनी पुढाकार घेत काल, २९ जुलैला ठाणेदार जयवंत सातव यांना निवेदन दिले. तातडीने मुलीचा शोध घेण्याची मागणी केली. यावेळी मुलीच्‍या आईसह विष्णू मेहेत्रे, ॲड. संदीप मेहेत्रे, संजय मेहेत्रे, मंगेश खुरपे, सिद्धार्थ जाधव आदी उपस्‍थित होते.