..तर आडगाव राजात कधीही घडू शकतो अनर्थ!; महिला सरपंचांनी केले अलर्ट!!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील आडगावराजा येथील गावठाणमधील ५० वर्षे जुने वीज खांब वाकलेले असून, ताराही तीर्ण झालेल्या असल्यामुळे वारंवार तुटतात. यामुळे गावात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांत ही दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आडगाव राजा येथील सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  तालुक्यातील आडगावराजा येथील गावठाणमधील ५० वर्षे जुने वीज खांब वाकलेले असून, ताराही तीर्ण झालेल्या असल्यामुळे वारंवार तुटतात. यामुळे गावात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांत ही दुरुस्‍तीची कामे हाती घ्यावीत अन्यथा ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा  इशारा आडगाव राजा येथील सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांनी उपअभियंत्‍यांना निवेदनाद्वारे दिला. याबाबतीत वीज वितरण कार्यालयात लेखी व तोंडी निवेदन देण्यात आली. परंतु कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. डीपीवर ए.बी.स्वीच  नसल्याने परमीट घेऊन गावठाण बंद करावे लागते जर गावात तार तुटली तर परमीट घेतल्याशिवाय बंद करता येत नाही.  त्यामुळे गावात शॉक लागून जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे.