“खडकपूर्णा’चे तीन दरवाजे उघडले!; नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले खडकपूर्णा धरण आज, १ सप्टेंबरला सायंकाळी साडेसातपर्यंत ८३ टक्के भरले. त्यामुळे रात्री ८ वाजता धरणाचे ३ दरवाजे १० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली …
 
“खडकपूर्णा’चे तीन दरवाजे उघडले!; नदीकाठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेले खडकपूर्णा धरण आज, १ सप्‍टेंबरला सायंकाळी साडेसातपर्यंत ८३ टक्के भरले. त्‍यामुळे रात्री ८ वाजता धरणाचे ३ दरवाजे १० सेंमी.ने उघडण्यात आले आहेत. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. खडकपूर्णा धरणाची पातळी ५१९.८५ मीटर असून, सध्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने ८०.१५ टक्‍के इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढली तर खडकपूर्णा धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी पूरनियंत्रणाकरिता उघडावे लागतील. त्यामुळे पूरपरिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीकाठच्या ३३ गावांना इशारा देण्यात आला असून, नदीपात्राशेजारील जनावरे, शेतीउपयोगी साहित्य व अन्य सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज रात्री धरणाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.