…तर कोणत्‍याही क्षणी लुटारू खासगी रुग्‍णालयावर भरारी पथकाचा छापा!; जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभर नियुक्‍त केली पथके

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनीही घेत प्रशासनाला निर्देश दिले होते. अखेर आज, 15 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके नियुक्त केली आहेत. लुटारू रुग्णालयांवर कोणत्याही क्षणी ही पथके छापा मारून तपासणी करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या नेतृत्वाखालील या समितीत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात खासगी रुग्‍णालयांकडून रुग्‍णांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याच्‍या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल पालकमंत्र्यांनीही घेत प्रशासनाला निर्देश दिले होते. अखेर आज, 15 एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांनी भरारी पथके नियुक्‍त केली आहेत. लुटारू रुग्‍णालयांवर कोणत्‍याही क्षणी ही पथके छापा मारून तपासणी करणार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या नेतृत्वाखालील या समितीत 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 26 खासगी कोविड रुग्णालयांची तपासणी हे अधिकारी करणार आहेत. रुग्णांकडून शासनाच्या निर्देशानुसार बिल घेण्यात यावे. त्यापेक्षा अधिक बिलाची वसुली होत असेल तर आता डॉक्टरांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त खासगी कोविड रुग्णालयाचे आता ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  • हे अधिकारी करणार तपासणी
  • बुलडाणा येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल-प्रकाश पाटील,उपकोषागार अधिकारी बुलडाणा.
  • आशीर्वाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सहयोग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बुलडाणा- घनश्याम बोरले, उपकोषागार अधिकारी,बुलडाणा.
  • लद्धड हॉस्पिटल बुलडाणा-सुनील सरोदे लेखाधिकारी,बुलडाणा.

चिखली शहर
योगीराज हॉस्पिटल,डॉ हेडगेवार हॉस्पिटल,तायडे हॉस्पिटल,दळवी हॉस्पिटल- मंगलसिंग राजपूत,उपकोषागार अधिकारी चिखली.
सावजी हॉस्पिटल,जैस्वाल हॉस्पिटल,गंगाई हॉस्पिटल,पानगोळे हॉस्पिटल – सुनील बाहेकर,सहा लेखाधिकारी पंचायत समिती चिखली.

मेहकर
श्री गजानन हॉस्पिटल,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,मातोश्री हॉस्पिटल, गोविंद क्रिटिकल हॉस्पिटल- विनोद गीते,उपकोषागार अधिकारी मेहकर.
मलकापूर
ऑक्सिजन कोविड हेल्प सेंटर, आशीर्वाद हॉस्पिटल मलकापूर, मुरलीधर खर्चे हॉस्पिटल -संतोष पाटील, उपकोषागार अधिकारी, मलकापूर.
खामगाव
आश्विनी नर्सिंग होम, श्रीराम हॉस्पिटल -श्रीकृष्ण कोलते, उपकोषागार अधिकारी खामगाव

नांदुरा
श्री स्वामी समर्थ कोविड हेल्थ सेंटर – बबन ईटे, लेखाधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव.

सिंदखेडराजा
जिजाऊ हॉस्पिटल -प्रशांत कुळकर्णी, उपकोषागार अधिकारी,सिंदखेडराजा.
शेगाव
हॉटेल योगीराज पॅलेस शेगाव येथील श्री गजानन कोविड हेल्थ सेंटर, सोळंके हॉस्पिटल शेगाव, डॉ. विनय अग्रवाल यांचे हॉटेल लखदातार इन वाटिक चौक येथील कोविड रुग्णालय – दिलीप मुंडोकार,उपकोषागार अधिकारी शेगाव.