…तर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा वाढेल उद्रेक! 3 अलर्ट झोनचे अहवाल प्रलंबित

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील भानखेडमधून जिल्ह्यात प्रवेश करणार्या बर्ड फ्लूचा तूर्तास जिल्ह्यातील अन्य ठिकाणांना देखील धोका असल्याचे खळबळजनक वृत्त आहे. जिल्ह्यातील 3 अलर्ट झोनचे बर्ड फ्लू विषयक अहवाल अजूनही प्राप्त नसून, त्यावर उद्रेकाची संभाव्य दिशा व दशा स्पष्ट होणार आहे. यामुळे या अहवालाच्या प्रतीक्षेने प्रशासन प्रामुख्याने पशुसंवर्धन विभागाच्या दिल …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील भानखेडमधून जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या बर्ड फ्लूचा तूर्तास जिल्ह्यातील अन्य ठिकाणांना देखील धोका असल्याचे खळबळजनक वृत्त आहे. जिल्ह्यातील 3 अलर्ट झोनचे बर्ड फ्लू विषयक अहवाल अजूनही प्राप्त नसून, त्यावर उद्रेकाची संभाव्य दिशा व दशा स्पष्ट होणार आहे. यामुळे या अहवालाच्या प्रतीक्षेने प्रशासन प्रामुख्याने पशुसंवर्धन विभागाच्या दिल की धडकन तेज झाली आहे.
यापूर्वी जिल्ह्यात किमान 4 ठिकाणी अज्ञात कारणांमुळे पक्षी दगावल्याचे आढळले. यामध्ये भानखेड येथील 200 कोंबड्या मृत आढळल्या. याशिवाय संग्रामपूर येथे एक मैना, लोणार तालुक्यातील रायगाव येथे 6 कोंबड्या तर मेहकर तालुक्यातील मादनी परिसरात 4 जंगली बदके मृतावस्थेत आढळून आली. तालुका अधिकार्‍यांकडून याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पुंडलिक बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मृतक पक्ष्यांचे नमुने उच्च तपासणीसाठी पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण विभाग, औंध पुणे येथे पाठविण्यात आले. या पक्ष्यांचे मृत्यू बर्ड फ्लूमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेता प्रतिबंध व खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष एस. रामामूर्ती यांनी 4 स्पॉट अलर्ट झोन म्हणून जाहीर केले. राज्य शासनाचे मुख्य सचिवांचे निर्देश, प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध अधिनियम 2009 आणि सुधारित कृती आराखडा 2021 नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांनी यासंदर्भातील आदेश 25 जानेवारीला जारी केले. आज 26 जानेवारीला त्यातील भानखेडचा अहवाल पॉझिटिव्ह आला अन् ती बर्ड फ्लूची जिल्ह्यातील एन्ट्री ठरली! दरम्यान संग्रामपूर, मादनी, रायगाव येथील अहवाल आज 26 जानेवारीला रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले नव्हते. यातील काही वा सर्व अहवाल दुर्दैवाने पॉझिटिव्ह आले तर बर्ड फ्लूचा उद्रेक वाढणार हे उघड आहे, यातही चिखली, मेहकर व लोणार हे तालुके लागून आहेत.