…तर त्‍या उमेदवारांवर होणार फौजदारी दाखल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाने सन 2011-12 मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांना वारंवार पत्र पाठवूनसुद्धा ज्यांनी फेरतपासणीला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही अशा उमेदवारांची यादी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, बुलडाणा येथे नोटिस बोर्डवर लावण्यात आहे आहे. ज्या उमेदवारांचे नाव नोटीस बोर्डमधील यादीत आहे, अशा उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाने सन 2011-12 मधील स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांच्‍या उमेदवारांना वारंवार पत्र पाठवूनसुद्धा ज्‍यांनी फेरतपासणीला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही अशा उमेदवारांची यादी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, बुलडाणा येथे नोटिस बोर्डवर लावण्यात आहे आहे. ज्या उमेदवारांचे नाव नोटीस बोर्डमधील यादीत आहे, अशा उमेदवारांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र, जातीचा दाखला व जातीविषयक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह 8 दिवसांच्‍या आत सदर कार्यालयात सादर करावेत. या उमेदवारांनी 8 दिवसाचे आत कागदपत्रे सादर न केल्यास त्यांची गुणवत्ता खुली ठेवून प्रकरण नस्तीबद्ध करण्यात येईल. तसेच सन 2011-2012 मधील त्यांच्‍या कडे उपलब्ध असलेले जात वैधता प्रमाणपत्र भविष्यात वापरता येणार नाही. याची संपूर्ण दक्षता उमेदवाराने घ्यावी. तसे आढळून आल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अधिनियम 2000 व नियम 2012 मधील कलम 11 नुसार प्रशासकीय व फौजदारी कार्यवाहीस पात्र राहणार आहे, असे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडतळणी समिती मनोज मेरत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.