…तर बाजार समिती होईल ‘सिल’! सार्वजनिक ठिकाणी गर्दी कराल तर 500 रुपयांचा दणका!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : संचारबंदी दरम्यान ‘क्या करना यार घरमे बहुत बोअर हो गये’ किंवा ‘जाम कंटाळा आलाय यार’ असे म्हणत चौकात वा सार्वजनिक ठिकाणी उभे राहिले तर आता गॅंगमधील सर्वांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड होणार आहे. यामुळे असे उभे राहणे लईच महागात पडणार आहे. दुसरीकडे कोरोनविषयक निर्देश वा जमावबंदीचे उल्लंघन केल्यावरअगदी बाजार समितीदेखील सिल …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : संचारबंदी दरम्यान ‘क्या करना यार घरमे बहुत बोअर हो गये’ किंवा ‘जाम कंटाळा आलाय यार’ असे म्हणत चौकात वा सार्वजनिक ठिकाणी उभे राहिले तर आता गॅंगमधील सर्वांना प्रत्येकी 500 रुपयांचा दंड होणार आहे. यामुळे असे उभे राहणे लईच महागात पडणार आहे. दुसरीकडे कोरोनविषयक निर्देश वा जमावबंदीचे उल्लंघन केल्यावर
अगदी बाजार समितीदेखील सिल करण्याची कारवाई होऊ शकते.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज 26 फेब्रुवारीला जारी केलेल्या आदेशाच्या विस्तारात या व अशा विविध तरतुदी आहेत. सार्वजनिक ठिकाणी जास्‍तीची गर्दी करणाऱ्या प्रत्येकाला नुसताच 500 रुपये दंड होणार नसून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील होणार आहे. यामुळे रोड रोमिओ टाईपच्या रिकामटेकड्याना आता सांभाळून राहावे लागणार आहे. दुसरीकडे बाजार समितीमधील दुकाने, भाजी मंडई, भाजी विक्रेते, मांस मासे विक्रेते यांच्याकडे आलेल्या ग्राहकांनी मास्क बांधला नसेल तर पहिल्यावेळी आस्थापनांना 2 हजार दंड तर दुसऱ्यांदा ते सील करण्याचे निर्देश पालिका, महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.
…तर 30 दिवस सील
दरम्यान हॉटेल, परमिट बिअर बार चालकाने निर्देशांचे उल्लंघन केले तर त्याला 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. चित्रपटगृहे, व्यायामशाळा यांनी उल्लंघन केले तर 10 हजार रुपये दंड व ते 30 दिवसांकरिता सील करण्यात येणार आहे.