…तर माधुरी वाचली असती! बुलडाणा बसस्‍थानकावरही झाले होते कडाक्‍याचे भांडण, पण पोलिसांत जाण्याऐवजी म्‍हणाली होती, आमचं घरगुती मॅटर आहे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या झालेल्या एसटी वाहक माधुरी मोरेचा आणि खुनी अनिल भोसलेचा 9 एप्रिलला बुलडाणा बसस्थानकावरही वाद झाल्याचे समोर आले होते. दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. छेडछाडीचा प्रकार समजून तिच्या मदतीला विशेष पोलीस अधिकारीही धावले होते. मात्र त्यावेळी माधुरीनेच घरगुती भांडण असल्याचे सांगून निघून गेली होती. तिने त्याचवेळी पोलिसांची मदत …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रेमाच्‍या त्रिकोणातून हत्‍या झालेल्या एसटी वाहक माधुरी मोरेचा आणि खुनी अनिल भोसलेचा 9 एप्रिलला बुलडाणा बसस्‍थानकावरही वाद झाल्याचे समोर आले होते. दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले होते. छेडछाडीचा प्रकार समजून तिच्‍या मदतीला विशेष पोलीस अधिकारीही धावले होते. मात्र त्‍यावेळी माधुरीनेच घरगुती भांडण असल्याचे सांगून निघून गेली होती. तिने त्‍याचवेळी पोलिसांची मदत घेतली असती तर कदाचित वाचली असती.
अंत्री खेडेकर (ता. चिखली) येथील रहिवासी असलेल्या व एसटीच्‍या बुलडाणा आगारात वाहक म्‍हणून कार्यरत असणाऱ्या माधुरी भीमराव मोरे (25) या घटस्फोटित तरुणीची काल, 16 एप्रिलला पहाटे गळा चिरून हत्‍या झाल्याचे समोर आले होते. अंत्री खेडेकर शिवारात तिचा गळा चिरलेला व हातापायावर चाकूचे वार असलेला मृतदेह आढळला होता. अवघ्या काही तासांतच अंढेरा पोलिसांनी खुन्याचा माग काढत तिचा माजी प्रियकर अनिल भोसले याला अटक केली होती. अनिल भोसलेसुद्धा एसटी वाहक आहे. दोघांची ओळख जाफराबाद आगारात माधुरी कार्यरत असताना झाली होती. अनिलला सोडून माधुरीचे दुसरीकडे प्रेमसंबंध सुरू झाले होते. ही बाब अनिलला सहन होत नव्हती. त्यामुळे त्याचे वारंवार माधुरीसोबत भांडण व्हायचे. 9 एप्रिलला दुपारी अडीचच्‍या सुमारास बुलडाणा बसस्थानकावरही त्‍यांच्‍यात कडाक्याचे भांडण झाले होते. तिचा फोन अनिलने हिसकावून घेतला होता व तिला गाडीवर बसायला सांगत होता. हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेले छेडछाड विरोधी पथकाचे माजी अध्यक्ष तथा विशेष पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे यांनी बघितला.हा छेडछाडीचा प्रकार तर नाही ना असे वाटल्याने श्री. वाघमारे यांनी माधुरीला पोलीस मदत हवी आहे का, असे विचारले असता आमचे घरगुती मॅटर आहे, असे माधुरीने सांगितले होते. काही वेळानंतर माधुरी वाहतूक नियंत्रण कक्षात निघून गेली व अनिलही तिथून निघून गेला. वेळीच माधुरीने पोलिसांची मदत घेतली असती तर कदाचित कालची घटना घडली नसती, असे श्री. वाघमारे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाले.