तलवार घेऊन फिरत होता, अमडापूर पोलिसांनी पाठलाग करत पकडला..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तलवार घेऊन फिरणाऱ्यास अमडापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. विलास ऊर्फ गोपाळ सुभाष कबाडे (28, रा. टाकरखेड मुसलमान, ता. चिखली) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. काल, 25 मार्चला विलास हारणी (ता. चिखली) येथे हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हारणी गाव गाठले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तलवार घेऊन फिरणाऱ्यास अमडापूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. विलास ऊर्फ गोपाळ सुभाष कबाडे (28, रा. टाकरखेड मुसलमान, ता. चिखली) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

काल, 25 मार्चला विलास हारणी (ता. चिखली) येथे हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी हारणी  गाव गाठले असता तो उंद्रीकडे गेल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी आपला मोर्चा उंद्रीकडे वळवला. उंद्रीकडे जात असतानाच बेलासरी गावाजवळ त्यांनी विलासवर झडप घातली. त्याच्याकडून तलवार जप्त केली. तलवारीचा परवाना त्‍याच्‍याकडे नव्‍हता. अमडापूर पोलीस ठाण्यात अवैध शस्र बाळगल्याप्रकरणी त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.