तलावात पोहणाऱ्यांची गर्दी, पोलिसांचा ताफा धडकताच पळापळ, काहींनी कपडे तसेच सोडून ठोकली धूम!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असूनही खामगाव शहराजवळील जनुना तलावात आज, 15 मे रोजी सकाळी पोहणाऱ्या व परिसरात व्यायाम करणाऱ्या 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गेटसमोर उभी त्यांची 24 वाहने जप्त करण्यात आली. अचानक पोलिसांचा ताफा आलेला पाहून एकच पळापळ सुरू झाली. काहींनी तर कपडे तसेच टाकून पळ काढला. अप्पर …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक लॉकडाऊन असूनही खामगाव शहराजवळील जनुना तलावात आज, 15 मे रोजी सकाळी पोहणाऱ्या व परिसरात व्‍यायाम करणाऱ्या 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. गेटसमोर उभी त्‍यांची 24 वाहने जप्‍त करण्यात आली. अचानक पोलिसांचा ताफा आलेला पाहून एकच पळापळ सुरू झाली. काहींनी तर कपडे तसेच टाकून पळ काढला.

अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांना जनुना तलावाजवळ गर्दी असल्याची माहिती मिळाली. श्री. राजपूत, शहरचे ठाणेदार श्री. अंबुलकर, शिवाजीनगरचे ठाणेदार सुनील हुड यांच्‍या पथकाने तलावावर धडक दिली. या ठिकाणी 18 जणांना ताब्‍यात घेण्यात आले. त्‍यांची वाहने ट्रकमध्ये भरून पोलीस ठाण्यात नेण्यात आली. यात अनेक प्रतिष्ठितांचाही समावेश होता हे विशेष.  त्‍यांच्‍यावरही कारवाई झाली.