तलावात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; मेहकर शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २५ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, ८ जुलै रोजी सायंकाळी ५च्या सुमारास मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील तलावात घडली. विकास अशोक गिधे (रा. मिलिंदनगर, मेहकर) असे बुडून मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल संध्याकाळी मेहकर पोलीस स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील तलावात विकासचा मृतदेह आढळला. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः २५ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल, ८ जुलै रोजी सायंकाळी ५च्या सुमारास मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील तलावात घडली.

विकास अशोक गिधे (रा. मिलिंदनगर, मेहकर) असे बुडून मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल संध्याकाळी मेहकर पोलीस स्टेशन समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील तलावात विकासचा मृतदेह आढळला. मेहकर पोलिसांनी मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जिल्ह्यात २ दिवसांत ४ जण बुडाले
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ७ जुलै रोजी वाकी बुद्रूक (ता. देऊळगाव राजा) येथे अमरदीप शंकर बनसोडे(१४) आणि सोहम परमेश्वर बनसोडे (१२) या दोन सख्ख्या चुलत भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ८ जुलै रोजी सावखेड भोई (ता. देऊळगाव राजा) येथील धरणात बुडून उमेश किरण मुळे (२३) याचा मृत्यू झाला तर काल मेहकर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील तलावात विकास अशोक गिधे याचा मृत्यू झाला.