तळणीच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू; जिल्ह्यात बळींचा आकडा 164 वर; दिवसभरात नवे 22 पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 23 जानेवारीला आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान तळणी (ता. मोताळा) येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 164 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 56 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने आज, 23 जानेवारीला आणखी एक बळी घेतला असून, उपचारादरम्यान तळणी (ता. मोताळा) येथील 80 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा 164 वर गेला आहे. दरम्यान, दिवसभरात 22 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 56 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 841 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 819 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 14 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 546 तर रॅपिड टेस्टमधील 273 अहवालांचा समावेश आहे.

  • पॉझिटिव्ह आलेले अहवाल
  • संग्रामपूर तालुका : अकोली 1
  • शेगाव शहर : 1
  • चिखली तालुका : गांगलगाव 1, मुंगसरी 1
  • चिखली शहर : 3
  • देऊळगाव राजा शहर : 3
  • लोणार तालुका : खुरमपूर 1
  • देऊळगाव राजा तालुका : जवळखेड 1, सिनगाव जहागीर 1, तुळजापूर 1
  • खामगाव तालुका : भालेगाव 1
  • खामगाव शहर : 4
  • मेहकर तालुका : जानेफळ 1
  • जळगाव जामोद शहर : 2

56 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 56 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 9, स्त्री रुग्णालय 3, देऊळगाव राजा : 7, चिखली : 11, मोताळा : 5, खामगाव : 9, नांदुरा : 1, संग्रामपूर : 2, शेगाव : 8, जळगाव जामोद : 1
325 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 1 लक्ष रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13072 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 3590 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13561 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 325 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 164 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.