तळागाळातील लोकांना एलआयसीशी जोडणारे एम. आर. गायकवाड

इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असली की काहीच अशक्य नसतं, याची जाणीव एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर एम. आर. गायकवाड यांच्याकडे पाहून होते. अकोला आपल्या शहरापासून 163 किलोमीटर दूर असलेल्या सिंदखेड राजासारख्या अगदीच नवख्या शहरात येऊन त्यांनी ज्या संघर्षमय आयुष्यातून आज यशाचे शिखर गाठले त्याला तोड नाही. स्वतः यश मिळवत असताना त्यांनी अनेकांनाही आयुष्यात उभे केले. त्यामुळे ते …
 
तळागाळातील लोकांना एलआयसीशी जोडणारे एम. आर. गायकवाड

इच्छाशक्ती आणि मेहनतीची तयारी असली की काहीच अशक्य नसतं, याची जाणीव एलआयसीचे डेव्हलपमेंट ऑफिसर एम. आर. गायकवाड यांच्याकडे पाहून होते. अकोला आपल्या शहरापासून 163 किलोमीटर दूर असलेल्या सिंदखेड राजासारख्या अगदीच नवख्या शहरात येऊन त्यांनी ज्या संघर्षमय आयुष्यातून आज यशाचे शिखर गाठले त्याला तोड नाही. स्वतः यश मिळवत असताना त्यांनी अनेकांनाही आयुष्यात उभे केले. त्यामुळे ते त्यांच्यासाठी खरे मार्गदर्शक, आधारस्तंभ ठरले. आजघडीला श्री. गायकवाड यांना ओळखत नाही असा व्यक्ती सिंदखेडराजात सापडणेच दुर्मिळ. एलआयसीला तळागाळातील लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेच पण एलआयसीवरील लोकांच्या विश्‍वासालाही कधी त्यांनी तडा जाऊ दिला नाही, हे विशेष. त्यामुळे एलआयसीवरील लोकांचा विश्‍वास वृद्धिंगत होत गेला आणि आजघडीला हजारो लोक एलआयसीशी तालुक्यात जोडले गेलेले आहेत. 29 मार्चला श्री. गायकवाड यांचा वाढदिवस, यानिमित्ताने त्यांच्याशी बुलडाणा लाइव्‍हचे सिंदखेड राजा प्रतिनिधी बाळासाहेब भोसले यांनी साधलेला संवाद…

पहिल्याच जॉबमधून फुलवले आयुष्य…
श्री. गायकवाड मूळचे अकोल्याचे. 29 मार्च 1969 रोजी त्यांचा जन्म झाला. घरी आई, वडील, लहान भाऊ असं कुटुंब. परिस्थिती बेताचीच होती. आरएनटी कॉलेजमध्ये श्री. गायकवाड बीएस्सीचे शिक्षण घेत होते. शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी एलआयसीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे त्यांना या परीक्षेत चांगले यश मिळाले. परीक्षेनंतर मुलाखत होती. मुलाखत कशी होईल, निवड होईल का, याबद्दल ते साशंक होते. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे त्यांना वाटत नव्हते आणि त्याबद्दल ते फार आशावादीही नव्हते. मुलाखत दिल्यानंतर ते विसरूनही गेले. मात्र दोन महिन्यांनी त्यांना अचानक निवड झाल्याचं कळविण्यात आलं आणि त्यांना सुखद धक्काच बसला. एलआयसीकडून आपल्या मूळ शहर, गावापासून दीडशे किलोमीटर अंतरावर नियुक्ती देण्यात येते. त्यांना बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नियुक्ती देण्यात आली. पूर्णपणे नवखे शहर. कुणीच ओळखीचे नाही. अशाही परिस्थितीत त्यांनी एकेक करत माणूस जोडला, शेकडो आणि आजघडीला हजारो लोकांशी त्यांचा संपर्क आहे. तातडीने जॉबला लागण्याचे आणखी एक कारण होते. त्यांचे लहान बंधू तेव्हा शिकत होते. नोकरीला लागलो तर लहान भावाला स्पर्धा परीक्षेसाठी सहकार्य करता येईल, असा त्यांचा उद्देश होता. त्यांचे तेही स्वप्न पूण झाले असून, आजघडीला त्यांचे लहान बंधू नागपूरला ॲडमिनिस्ट्रेटर ऑफिसर आहेत. त्यांना रसिका आणि जान्हवी अशा दोन मुली असून, दोघीही उच्च शिक्षण घेत आहेत. रसिका एमडीएस तर जान्हवी बीडीएस करतेय.

अडचणी येतातच, मात करून पुढे जायचं असतं…
आयुष्याच्या वाटचालीत अडचणी येतच असतात. त्यावर हुशारीने मात करून पुढे जायचं असतं, असं श्री. गायकवाड सांगतात. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुरुवातीच्या काळात बेताचीच होती. या परिस्थितीवर मात करून, आर्थिक विवंचनेला तोंड देत त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी पदरात पडल्यावरही सुरुवातीच्या काळात संघर्ष करत आजचे यश पाद्रकांत केले आहे. एलआयसी ही त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन गोष्ट होती. अनुभव पाठिशी नसतानाही त्यांनी या क्षेत्रात चमकदार कामगिरी केली.

अमरावती विभागात सिंदखेड राजाचा डंका
एम. आर. गायकवाड हे 1991 साली सिंदखेड राजा येथे पीडीओ म्हणून रूजू झाले. 1992 पासून एजंटांची रिक्रूटमेंट त्यांनी सुरू केली. 650 जणांनानियुक्त केलं. त्यातील आज 76 जणांच्या कामात सातत्य आहे. एलआयसीच्या एकूण कामगिरीत सिंदखेड राजाचा डंका अवघ्या अमरावती विभागात वाजत आहे. याचे कारण या तालुक्यातील सहा जणांनी आंतरराष्ट्रीय मानांकन (एमडीआरटी) प्राप्त केले आहे. हा पूर्ण विभागात उच्चांक आहे. विशेष म्हणजे यातील एकाने सीओटी प्राप्त केली आहे. एकाच वर्षात एमडीआरटी करणाऱ्याला सीओटी हा बहुमान मिळतो. तो दशरथ राठोड यांना मिळाला आहे.

…म्हणून एलआयसी नंबर 1
एलआयसी हे उत्पन सुरक्षित करण्याचं साधन आहे. लग्नकार्य, म्हातारपणात एलआयसी मोठा आधार बनून समोर येते. उद्या मी राहिलो नाही तर आपल्या कुटुंबाचे काय, हा प्रश्‍न एलआयसी सोडवते. एलआयसीची स्थापना 1956 साली झाली. तेव्हापासून नंबर 1 वर आहे. आतापर्यंत एलआयसीचा ट्रॅक रेकार्ड चांगला आहे. सर्वाधिक दावे दिले जातात. सर्व कंपन्यांमध्ये रेषो 1 चा आहे. त्यामुळे प्रत्येकाने विमा काढताना एलआयसीचीच निवड केली पाहिजेत, असे आवाहनही श्री. गायकवाड यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना केले.

तो अविस्मरणीय क्षण…
श्री. गायकवाड यांनी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बुलडाणा लाइव्हला सांगितला. सहा वर्षांच्या आधी एका खेड्यातील कुटुंबाला मृत्यूदाव्याचा धनादेश देण्यासाठी ते गेले होते. या कुटुंबातील व्यक्ती नोकरीवर होता. त्यांच्या उपचारात मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते. तिथे धनादेश घेऊन गेल्यानंतर त्या कुटुंबाला भावना आवरता आल्या नाहीत. ज्या ठिकाणी तो व्यक्ती नोकरीला होता, तिथून एक रुपयाही आला नव्हता. पण एलआयसीने धनादेश घेऊन घर गाठल्याने त्यांचे कुटुंब भावनिक झाले. उपकार कधीच विसरणार नाहीत, असे कुटुंबातील सदस्य म्हणाले. तो क्षण माझ्यासाठी लाइफ टर्निंग होता. तेव्हा मला सोशल वर्क करत असल्याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली, असे श्री. गायकवाड म्हणाले.