तहसीलदार खंडारे उतरले रस्त्यावर! दंडात्मक कारवाईचा धडाका !!; 5 दिवसांतच पावणेचार लाखांचा दंड वसूल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आरपारच्या लढाईत कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी बुलडाणाचे तहसीलदार रुपेश खंडारे रस्त्यावर उतरले असून, त्यांनी दंडात्मक कारवाईचा धडाका लावलाय! त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेमतेम 5 दिवसांतच पावणे चार लाखांचा दंड वसूल केला आहे.तहसीलदारांनी 20 फेब्रुवारीपासून कारवाईचा वेग वाढवत विविध दुकाने, आस्थापनांची अचानक तपासणी करणे सुरू केले आहे. यामध्ये, जिमखाना, क्लब, …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आरपारच्या लढाईत कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी बुलडाणाचे तहसीलदार रुपेश खंडारे रस्त्यावर उतरले असून, त्यांनी दंडात्मक कारवाईचा धडाका लावलाय! त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेमतेम 5 दिवसांतच पावणे चार लाखांचा दंड वसूल केला आहे.
तहसीलदारांनी 20 फेब्रुवारीपासून कारवाईचा वेग वाढवत विविध दुकाने, आस्थापनांची अचानक तपासणी करणे सुरू केले आहे. यामध्ये, जिमखाना, क्लब, मंगल कार्यालये, उपहारगृहे, मॉल, धार्मिक स्थळे, खासगी कार्यालये, उद्याने, क्रीडांगणे यांचा समावेश आहे. यावेळी कोरोनाविषयक निर्देशांचे पालन न करणाऱ्या 28 जणांकडून 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान 1 लाख 47 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 20 फेब्रुवारीला केलेल्या कारवाईत तब्बल 1 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याने त्यांच्या पथकाची मालक चालकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसून येते.

मास्क प्रकरणी कठोर कारवाई
दरम्यान, कोरोनाचा प्रकोप वाढत असतानाही मास्क न घालता सार्वजनिक स्थळी फिरणाऱ्यांना दंडीत करण्यात येत आहे. या मुदतीत 1082 नागरिकांना 2 लाख 23 हजार 850 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.