तहसीलदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी, शंभरावर पोलीस; दंगाकाबू पथक, ४-५ रुग्‍णवाहिका, अग्निशामक दल सारेच एकाएकी चिखलीकडे धावले; असं काय झालं?

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तारीख २६ जुलै… संध्याकाळी साडेपाचची वेळ… एकाएकी शंभरपेक्षा अधिक पोलीस जवान, दंगाकाबू पथक, चार-पाच रुग्णवाहिका, अग्निशामक दल, तहसीलदारांपासून तर वरिष्ठ पोलीस अधिकारी, नगरपालिका कर्मचारी सारेच बुलडाण्यातून चिखलीकडे रवाना झाले. हे दृश्य बघणारे सारेच हैराण-परेशान झाले… चिखलीत काहीतरी घडल्याच्या चर्चेने जोर पकडला. काहीच मिनिटांत हा ताफा चिखली रोडवरील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तारीख २६ जुलै… संध्याकाळी साडेपाचची वेळ… एकाएकी शंभरपेक्षा अधिक पोलीस जवान, दंगाकाबू पथक, चार-पाच रुग्‍णवाहिका, अग्निशामक दल, तहसीलदारांपासून तर वरिष्ठ पोलीस अधिकारी, नगरपालिका कर्मचारी सारेच बुलडाण्यातून चिखलीकडे रवाना झाले. हे दृश्य बघणारे सारेच हैराण-परेशान झाले… चिखलीत काहीतरी घडल्‍याच्‍या चर्चेने जोर पकडला. काहीच मिनिटांत हा ताफा चिखली रोडवरील पैनगंगा नदीच्या पुलाजवळ जाऊन थांबला. नदीतून दुचाकीसह वाहत जाणाऱ्या एका युवकाला जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले. त्याला तात्काळ रुग्‍णवाहिकेत टाकण्यात आले व जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले. हे सर्व सुरू असताना रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही पोलीस कर्मचारी झटत होते. या सर्व प्रकारानंतर तहसीलदारांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना, अचानक उद्‌भवलेल्या आपत्तीचे निवारण कसे करायचे यासाठीची ही रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट केले. आज सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान या रंगीत तालीमचे आयोजन केले होते. यात सर्वांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली. तहसीलदार रुपेश खंडारे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे, सहायक पोलीस निरिक्षक जयसिंग पाटील, बुलडाणा शहर पोलीस स्टेशनच्‍या कर्मचाऱ्यांसह नगर परिषद ,आपत्ती निवारण पथक,अग्निशामक दल विभाग यांनी सहभाग घेतला.