तहसील कार्यालयातून पळवले अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्‍टर!; नांदुऱ्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून नांदुरा तहसील कार्यालयात उभे करण्यात आले होते. मात्र ते चाकूचा धाक दाखवून पळविल्याची खळबळजनक घटना २२ जूनला सकाळी अकराच्या सुमारास घडली. नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक पंकज डोसेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जून रोजी हिंगणे गव्हाड येथील तलाठी दत्तात्रय …
 
तहसील कार्यालयातून पळवले अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्‍टर!; नांदुऱ्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर जप्‍त करून नांदुरा तहसील कार्यालयात उभे करण्यात आले होते. मात्र ते चाकूचा धाक दाखवून पळविल्याची खळबळजनक घटना २२ जूनला सकाळी अकराच्‍या सुमारास घडली. नांदुरा पोलीस ठाण्यात ट्रॅक्‍टरचालक पंकज डोसेविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

१६ जून रोजी हिंगणे गव्‍हाड येथील तलाठी दत्तात्रय उके यांनी अवैध वाळू वाहतुकीचे विनानंबरचे ट्रॅक्‍टर पकडले होते. त्‍यात एक ब्रास वाळू होती. त्यावर मृत्यूंजय लिहिलेले होते. चालक पंकज डोसे (रा. सानपुडी ता. नांदुरा) याच्‍याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. त्‍यामुळे ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. २२ जूनला सकाळी अकराच्‍या सुमरास हे ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी डोसे आला. शिपाई भूपेंद्रसिंग गुलाबसिंग पवार त्‍याला थांबविण्यासाठी धावले असता त्‍याने चाकूचा धाक दाखवून त्‍याला ढकलून दिले व ट्रॅक्टर घेऊन पळून गेला. त्यामुळे नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी दिली.