तहसील कार्यालयात क्रूझर घुसविण्याचा प्रयत्‍न; भरधाव वाहन गेटवर धडकवले!; नांदुरा येथील खळबळजनक प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तहसील कार्यालयात क्रूझर कार धडकविण्याचा प्रयत्न समोर आला आहे. भरधाव वाहन गेटला धडकविण्यात आले. यात गेटचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाहन धडकवले तेव्हा नागरिक तेथे नव्हते. अन्यथा मनुष्यहानी झाली असती. ही घटना काल, १३ जुलैला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी तहसीलदार राहुल तायडे यांच्या वतीने दाखल झालेल्या तक्रारीवरून …
 
तहसील कार्यालयात क्रूझर घुसविण्याचा प्रयत्‍न; भरधाव वाहन गेटवर धडकवले!; नांदुरा येथील खळबळजनक प्रकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तहसील कार्यालयात क्रूझर कार धडकविण्याचा प्रयत्‍न समोर आला आहे. भरधाव वाहन गेटला धडकविण्यात आले. यात गेटचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने वाहन धडकवले तेव्हा नागरिक तेथे नव्‍हते. अन्यथा मनुष्यहानी झाली असती. ही घटना काल, १३ जुलैला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी तहसीलदार राहुल तायडे यांच्‍या वतीने दाखल झालेल्या तक्रारीवरून वाहनचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

क्रूझरच्‍या (क्र. एमएच १३ एन ७५८८) चालकाने जाणीवपूर्वक वाहन वेगात आणले. त्‍यानंतर या वाहनातून उडी मारून वाहन तहसील कार्यालयाच्‍या गेटवर धडकवले. या वाहनाची पाहणी केली असता वाहनामागे पंकज पाटील आणि दोन मोबाइल क्रमांक लिहिलेले आहेत. बुलडाणा लाइव्‍हने या मोबाइल नंबरची पडताळणी केली असता एक स्विच्‍ड ऑफ तर दुसरा यवतमाळ येथील १७ वर्षीय मुलाने उचलला. त्‍या मुलाने तीन वर्षांपासून हा नंबर आपण वापरत असल्याचे सांगितले. त्‍यामुळे तिथे कसा लिहिला गेला हे माहीत नसल्याचे सांगितले. हे वाहन धडकवले गेले तेव्हा गर्दी असती तर मोठी मनुष्यहानी झाली असती. त्‍यामुळे तहसीलदारांच्‍या वतीने विष्णू एकनाथ सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.