तापसी परदेशात फिरतेय साडीत!

तापसी तन्नू ही अभिनेत्री हटके म्हणूनच ओळखली जाते. साचेबद्ध भूमिका करण्यापेक्षा वेगळं काही तरी करण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिची राणी कश्यपची भूमिका गाजली आहे. कुठल्याही एका भूमिकेला एका विशेषणात बसविणं अवघड आहे, असं तिला वाटतं. साचेबद्ध भूमिकापलीकडील विश्व मला खुणावतं, असं पन्नू सांगते. नायिकेला खलनायकी भूमिकेत बसविणं जोखमीचं आहे, असं तिला वाटत नाही. नायिकेकडून असणाऱ्या …
 

तापसी तन्नू ही अभिनेत्री हटके म्हणूनच ओळखली जाते. साचेबद्ध भूमिका करण्यापेक्षा वेगळं काही तरी करण्याचा तिचा प्रयत्न असतो. तिची राणी कश्यपची भूमिका गाजली आहे. कुठल्याही एका भूमिकेला एका विशेषणात बसविणं अवघड आहे, असं तिला वाटतं. साचेबद्ध भूमिकापलीकडील विश्व मला खुणावतं, असं पन्नू सांगते.

नायिकेला खलनायकी भूमिकेत बसविणं जोखमीचं आहे, असं तिला वाटत नाही. नायिकेकडून असणाऱ्या अपेक्षांना भूमिका निभावताना तडा गेला नाही, की लोकही अशा भूमिकांना पसंती देतात, असा पन्नूचा अनुभव आहे. अशा भूमिका साकारणं हे आव्हान असतं. जोखीम पत्करल्याशिवाय काम करण्यात काही मजा नसते. त्यामुळं भूमिका कोणती याला महत्व नाही, तर ती कशी निभावली जाते, याला महत्व असतं. खेळाडूची भूमिका करताना केवळ अभिनय असून चालत नाही. त्यासाठी शरीर तसं बनवावं लागतं. खेळाडूंचे कष्ट आणि त्यांचा फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. तो एका दिवसात होत नाही. त्यामुळं खेळाडूची भूमिका निभावताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते, असं ती तिच्या खेळाडूच्चा भूमिकेबाबत सांगते. एवढी मेहनत क्वचितच इतर कोणत्या चित्रपटांसाठी करावी लागली, असं तिचं मत आहे.

स्त्रीप्रधान की, पुरुषप्रधान चित्रपट अशी साचेबद्ध नावं देणं तिला पसंत नाही; परंतु अलीकडच्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या वाढते आहे. हे चांगलं आहे, असं तिला वाटतं. चित्रपटांना जितकं महत्व नायकाचं असतं, तितकचं नायिकांचही त्यांना दाद मिळणं महत्त्वाचं. परदेशात फिरताना पन्नूनं साडी वापराचा एक नवा ट्रेंड तयार केला आहे. त्याबाबत ती म्हणते, की लोकांच्या मनात साडीबद्दल एक वेगळी प्रतीमा आहे. साडी नेसून तिच्यात वावरणं कठीण आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमुळं मला साडीत वावरायची सवय झाली, असं ती सांगते. तापसीकडं साड्यांचं स्वतःचं कलेक्शन आहे. स्वतःला मॉडर्न पद्धतीची जोड देत साडी नेसायला तिला आवडतं.