बुलडाणा : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आग!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनची धामधूम असतानाच बुलडाणा शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आज, 8 जानेवारीला दुपारी 2 वाजता आग लागली. वेळीच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेऊन ती विझविल्याने अनर्थ टळला. बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील ड्राय रन आज यशस्वी पार पडली. यामुळे आरोग्य विभाग आनंदात असताना जिल्हा न्यायालयानजीकच्या जिल्हा …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनची धामधूम असतानाच बुलडाणा शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आज, 8 जानेवारीला दुपारी 2 वाजता आग लागली. वेळीच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने धाव घेऊन ती विझविल्याने अनर्थ टळला.

बुलडाणा जिल्हा रुग्णालयातील ड्राय रन आज यशस्वी पार पडली. यामुळे आरोग्य विभाग आनंदात असताना जिल्हा न्यायालयानजीकच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला आग लागल्याची खबर दुपारी 2 वाजताच्या आसपास आली. ही खबर आगीसारखी फैलली! बुलडाणा पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. एक टँकर रिकामे झाल्यावर ही आग आटोक्यात आली. कर्मचार्‍यांनी आरोग्य अधिकारी कार्यालयाचे रेकॉर्ड व सर्व साहित्य सुरक्षित ठिकाणी नेले. यात जिवितहानी नाही झाली. मात्र मोठे नुकसान झाले आहे. आगीत किती नुकसान झाले, काय जळाले याचा तपशील घेणे सुरू आहे, असे डॉ. तडस यांनी बुलडाणा लाईव्हला सांगितले. घटनास्थळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, तहसीलदार रुपेश खंडारे यांनी भेट दिली. नगरपरिषदेचे सुधीर भालेराव, संजय जाधव आदी उपस्थित होते.