तिचा फोन आला अन्‌ लाख रुपये गायब झाले!; सोनाळ्यातील शेतकऱ्याने ओढावून घेतली नसती आफत!

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसबीआय बँकेची प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून एका महिलेने सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील शेतकऱ्याला तब्बल 1 लाख रुपयांनी गंडवले आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलीम शेख सुलतान (38) यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्यांना बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळाले होते. 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या फोनवर …
 

संग्रामपूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एसबीआय बँकेची प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून एका महिलेने सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील शेतकऱ्याला तब्‍बल 1 लाख रुपयांनी गंडवले आहे. याप्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख सलीम शेख सुलतान (38) यांचे भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. त्यांना बँकेकडून क्रेडिट कार्ड मिळाले होते. 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या फोनवर एक फोन आला. तुमचे क्रेडिट कार्ड बंद झाले आहे. ते सुरू करण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती विचारली. बोलणारी हिंदी भाषिक महिला होती. तिने यांच्या क्रेडिट कार्डवरील सुरुवातीचे चार आकडे सांगितल्याने ती एसबीआय बँकेतून बोलत असल्याचा विश्वास शेख सलीम यांना वाटला. त्यामुळे शेख सलीम यानी कार्डवरील उर्वरित 12 आकडे, कार्ड व्‍हॅलिडिटी महिना व वर्ष सांगितले. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपीही सांगितला. त्‍यानंतर महिलेने फोन ठेवून दिला. त्यानंतर 24 मार्च रोजी शेख सलीम यांना अमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी करायची होती. त्यावेळी खात्यात पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांना धक्का बसला.  त्यांनी बँकेकडून स्टेटमेंट मागविले असता 9 फेब्रुवारी रोजी 41,800 असे दोन वेळेस व दिनांक 10  फेब्रुवारीला 16000 असे एकूण 99600 रुपये त्यांच्या खात्यातून कपात झाल्याचे दिसले. www. mobikwik.in या एंट्रीद्वारे पैसे खात्यातून गायब झाल्याचे शेख सलीम यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून काल, 4 एप्रिलला रोजी सोनाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.