तिने सासरच्या छळाला कंटाळून केला होता आत्मघात!; खामगावातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 21 मार्चला घरात कुणी नसताना सौ. जान्हवी मुकुंद जोशी (रा. सिद्धिविनायकनगर, घाटपुरी रोड, खामगाव) या विवाहितेने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी तिच्या पतीसह 4 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनायक दामोदर पानट (रा. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 21 मार्चला घरात कुणी नसताना सौ. जान्हवी मुकुंद जोशी (रा. सिद्धिविनायकनगर, घाटपुरी रोड, खामगाव) या विवाहितेने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी तिच्‍या पतीसह 4 जणांविरुद्ध आत्‍महत्‍येस प्रवृत्त केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विनायक दामोदर पानट (रा. मलकापूर) यांनी तक्रार दिली की त्यांची मुलगी जान्हवी हीचा सासरची मंडळी शारीरिक व मानसिक छळ करत होती. हुंड्याचे 5 लाख रुपये माहेरहून आण, असा तगादा वारंवार लावला जात होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी जान्हवीचा पती राहुल जोशी, सासरे मुकुंद जोशी, दीर कौस्तुभ जोशी, नणंद निवेदिता जोशी (सर्व रा. सिद्धिविनायक नगर, घाटपुरी रोड खामगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.