तिला अन्‌ तिच्‍या प्रियकराला आवरा; मलकापूरमध्ये त्‍या भागातले नागरिक गेले पोलिसांकडे!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माता महाकाली परिसरातील रहिवासी एका ३२ वर्षीय महिलेला आणि तिच्या प्रियकराला आवर घालण्याची मागणी या भागातील नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन केली. मलकापूर शहर पोलीस ठाण्याला निवेदनही देण्यात आले. महिला आणि तिच्या प्रियकराचया कृत्यामुळे परिसराची बदनामी तर होतच आहे. मात्र नागरिकांनाही त्रास होत आहे. भररस्त्यावर या युगुलाचे नको ते चाळे …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः माता महाकाली परिसरातील रहिवासी एका ३२ वर्षीय महिलेला आणि तिच्‍या प्रियकराला आवर घालण्याची मागणी या भागातील नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन केली. मलकापूर शहर पोलीस ठाण्याला निवेदनही देण्यात आले.

महिला आणि तिच्‍या प्रियकराचया कृत्‍यामुळे परिसराची बदनामी तर होतच आहे. मात्र नागरिकांनाही त्रास होत आहे. भररस्‍त्‍यावर या युगुलाचे नको ते चाळे सुरू असतात. २८ जुलैला रात्री दोघे असेच रस्‍त्‍यावर मश्गुल असताना काही युवकांनी हटकले. त्‍यामुळे वाद झाला होता. त्‍यानंतर नागरिक व युवकांनी पोलीस ठाणे गाठून या महिलेसह तिच्‍या पतीविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.