तिला बसस्‍थानकावर घरी जाण्यासाठी सोडले, ती गायब झाली!; शेगाव येथील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 17 वर्षीय युवती शेगाव बसस्थानकावरून गायब झाली आहे. ती बेपत्ता झाल्याची तक्रार आज, 15 मे रोजी तिच्या नातेवाइकाने केली आहे. तिला फूस लावून पळवल्याचा संशय आहे. विष्णू नारायण पाकदाणे (38, रा. झोपडपट्टी नागझरी, ता. शेगाव) यांनी या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की त्यांची …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 17 वर्षीय युवती शेगाव बसस्‍थानकावरून गायब झाली आहे. ती बेपत्ता झाल्‍याची तक्रार आज, 15 मे रोजी तिच्‍या नातेवाइकाने केली आहे. तिला फूस लावून पळवल्याचा संशय आहे.

विष्णू नारायण पाकदाणे (38, रा. झोपडपट्टी नागझरी, ता. शेगाव) यांनी या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांची पत्‍नी सौ. चेतना यांच्‍या नातेवाइकाची मुलगी कल्पना (नाव बदलले आहे) मडाखेड येथून भेटायला 4 मे रोजी आली होती. तिच्‍या भावाच्‍या हसन नावाच्‍या मित्राच्‍या (रा. कवठाळ ता. जळगाव जामोद) गाडीवर ती शेगाव येथे आली होती. 10 मे रोजी तिने मला घरी जायचेय बसस्‍थानकापर्यंत सोडा, असे सांगितले. गावावरून गाडी येणार असल्याचे ती म्‍हणाली. त्‍यामुळे शेगावला जात असलेल्या गावातीलच दर्शन डिगांबर कराळे याच्‍या दुचाकीवर तिला बसवून शेगाव येथे सोडण्यास सांगितले. सकाळी 7 वाजता फोनवर तिने बसस्‍थानकावर पोहोचल्याचे सांगितले. सकाळी 10 वाजता तिने घरी पोहचल्‍याचा निरोप दिला. पाकदाणे यांच्‍या पत्‍नीने आईसोबत बोलणे करून दे, असे म्हटले तर तिने आई कामाला गेली आहे तू नंतर फोन कर, असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तिचा फोन 12 वाजेपासून बंद येऊ लागला. तिचा नातेवाइक व इतर लोकांच्या घरी शोध घेतला. परंतु ती आजपर्यंत मिळून आली नाही. ती अल्पवयीन असून तिला कोणी तरी फूस लावून पळून नेल्‍याचा संशय तक्रारीत व्‍यक्‍त करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा दाखल करून मुलीचा शोध सुरू करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरिक्षक श्रीमती गोसावी करत आहेत.