तिसऱ्या लाटेचा बालकांचा अधिक धोका!; पालकांनो ‘हे’ करा!!

बुलडाणा (बुलडाण लाइव्ह वृत्तसेवा)ः जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक समोर आल्याने तिसऱ्या लाटेची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. या लाटेचा फटका बालकांचा सर्वाधिक बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसे असेल तर पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, सरकारी उपाययोजनांच्या भरवशावर न बसता आपल्या पाल्यांना कोरोनापासून दूर ठेवले …
 

बुलडाणा (बुलडाण लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जुलै-ऑगस्‍टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक समोर आल्याने तिसऱ्या लाटेची धास्‍ती सर्वांनीच घेतली आहे. या लाटेचा फटका बालकांचा सर्वाधिक बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसे असेल तर पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून, सरकारी उपाययोजनांच्‍या भरवशावर न बसता आपल्या पाल्यांना कोरोनापासून दूर ठेवले पाहिजेत.

पालकांनी ही काळजी घ्यावी…

  • शिंकताना व खोकताना तोंडासमोर रुमाल अथवा टिश्यूपेपर धरा.
  • बोलताना कमीत कमी सहा फूट अंतर राखा. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नका.
  • मुलांना ताप, खोकला; तसेच श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक चूकवू नका.
  • निरोगी आतडे मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. दह्यासारख्या पदार्थातील प्रोबायोटिक्स आतडे निरोगी ठेवते.
  • मुलांना सतत एकाच जागी बसवून न ठेवता त्यांच्या शारीरिक हालचाली वाढवून त्यांना सक्रिय राहण्यासाठी प्रोत्साहित करा.
  • शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर असू शकते. १२ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे अधिक उत्तम ठरते.

सरकार काय करतेय?
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोव्हिड टास्क फोर्स तयार करण्याच्‍या हालचाली सुरू आहेत. बाधित मुलांची संख्या वाढल्यास बालरोग तज्ज्ञांवरील ताण वाढणार आहे. त्यामुळे परिचारिकांनाही याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अद्याप लहान मुलांसाठी लस उपलब्ध नसल्याने सुरक्षित वावर, मास्क, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा अवलंब अधिक प्रभावीपणे करावा लागणार आहे.