तीनदा लग्‍न होऊनही पुन्‍हा माहेरी आली अन्‌ वडिलांना यमसदनी पाठवले!; मलकापुरातील खळबळजनक घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीनवेळा लग्न होऊनही सासरी न पटल्याने माहेरी आलेल्या मुलीस वडिलांनी घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे मुलगी आणि सख्ख्या पुतण्याने मिळून ५२ वर्षीय व्यक्तीची छातीत सुरा खुपसून हत्या केली. मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोसनगरात ही घटना काल, ८ सप्टेंबरच्या रात्री ९ च्या सुमारास समोर आली. पोलिसांनी दोघांनाही अटक करत हत्येचा गुन्हा दाखल …
 
तीनदा लग्‍न होऊनही पुन्‍हा माहेरी आली अन्‌ वडिलांना यमसदनी पाठवले!; मलकापुरातील खळबळजनक घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीनवेळा लग्‍न होऊनही सासरी न पटल्‍याने माहेरी आलेल्या मुलीस वडिलांनी घरात घेण्यास नकार दिला. त्‍यामुळे मुलगी आणि सख्ख्या पुतण्याने मिळून ५२ वर्षीय व्‍यक्‍तीची छातीत सुरा खुपसून हत्‍या केली. मलकापूर शहरातील सुभाषचंद्र बोसनगरात ही घटना काल, ८ सप्‍टेंबरच्‍या रात्री ९ च्‍या सुमारास समोर आली. पोलिसांनी दोघांनाही अटक करत हत्‍येचा गुन्‍हा दाखल केला आहे.

गुलाबराव यादवराव रावणचवरे असे हत्‍या झालेल्याचे नाव आहे. तो मुक्‍ताईनगर बसथांब्यामागे राहत होता. दारूच्‍या नशेत घरात खुर्चीवर बसलेला असताना मुलगी सौ. लक्ष्मी हरिश्चंद्र सनिसे (१९) व पुतण्या प्रकाश साहेबराव रावणचवरे (२८, रा. बहापुरा) यांनी मिळून त्‍यांच्‍या छातीवर धारदार सुऱ्याने सपासप वार केले. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्‍तस्‍त्राव होऊन गुलाबराव जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी, पोलीस निरिक्षक प्रल्हाद काटकर सहकाऱ्यांसह घटनास्‍थळी दाखल झाले. प्राथमिक तपास सहायक पोलीस निरिक्षक विश्वजीत ठाकूर, पोलीस कॉन्‍स्‍टेबल प्रमोद राठोड, कैलास पवार यांनी करून लक्ष्मी व प्रकाशला अटक केली.

बदनामी होईल म्‍हणून विरोध केला अन्‌…
तीन वेळा लग्‍न होऊनही लक्ष्मी माहेरी आल्याने गुलाबराव संतप्‍त झाले. त्‍यांनी तुझ्यामुळे अन्य मुलींचे लग्‍न होणार नाही. तू इथे राहू नको. सासरी जा किंवा कुठेही जा. तुझ्यामुळे आमची बदनामी होते, असे लक्ष्मीला सांगितले. त्‍यामुळे लक्ष्मी आणि प्रकाश यांना राग आला. दोघांनी मिळून सुऱ्याने छातीवर वार करून गुलाबराव यांना ठार केले. या प्रकरणी वैष्णवीची लहान बहीण वैष्णवी हिने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्‍याविरुद्ध खुनाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.