पतीने वेळीच बघितल्याने वाचली गळफास घेतलेली पत्‍नी!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने बाहेरून आलेल्या पतीने बघितल्याने लगेच तिला खाली उतरवले व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ही घटना आज, ८ जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास बुलडाणा शहरातील भीमनगरात घडली. रेखा संतोष खरात असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पती संतोष भाऊराव खरात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ३१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने बाहेरून आलेल्या पतीने बघितल्याने लगेच तिला खाली उतरवले व जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. ही घटना आज, ८ जुलैला सायंकाळी सातच्‍या सुमारास बुलडाणा शहरातील भीमनगरात घडली. रेखा संतोष खरात असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. पती संतोष भाऊराव खरात (३६) दळण आणायला बाहेर गेला होता. त्याचवेळी रेखाने संधी साधून घरातील स्लॅबच्या कडीला गळफास घेतला. मात्र सुदैवाने त्‍याचवेळी संतोष घरी परतला. त्‍याने पत्‍नीने गळफास घेतल्याचे दिसताच लगेच तिला उतरवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.तीने वेळीच बघितल्याने वाचली गळफास घेतलेली पत्‍नी!; बुलडाणा शहरातील घटना