तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना आज, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मंगरूळ नवघरे (ता. चिखली) येथे घडली. धम्मप्रसेन भीमराव जाधव (२४, रा. मंगरूळ नवघरे, ता. चिखली) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धम्मप्रसेन त्याच्या वडिलांसोबत शेतातून घराकडे परत येत होता. शेतातील तूर …
 
तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला; चिखली तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तीन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. ही घटना आज, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मंगरूळ नवघरे (ता. चिखली) येथे घडली.

धम्मप्रसेन भीमराव जाधव (२४, रा. मंगरूळ नवघरे, ता. चिखली) असे हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धम्मप्रसेन त्याच्या वडिलांसोबत शेतातून घराकडे परत येत होता. शेतातील तूर वाढल्याने त्यांना अस्वल दिसले नाहीत. एकाएकी अस्वलांनी धम्मप्रसेनवर हल्ला चढविला. त्यावेळी सोबत असलेल्या वडिलांनी आरडाओरड केली.

हातातील काठीने धम्मप्रसेनच्या वडिलांनी अस्वलांना पिटाळण्याचा प्रयत्‍न केला. रोही व हरणांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सोबत फटाके आणले होते. समयसूचकता दाखवत धम्मप्रसेनच्या वडिलांनी फटाके फोडले. त्यामुळे अस्वल पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या धम्मप्रसेनला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्वलाच्या मुक्त संचारामुळे मंगरूळ-नवघरे, अमडापूर शिवारातील शेतकरी भयभीत झाले आहेत.